Menu

Buddhist Society

भारतीय बौद्ध महासभेच्यामुंबई : ( दि. 25/11/2023)- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली धम्मसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शाखेच्या अध्यक्ष ,सरचिटणीस ,कोषाध्यक्ष ,
हिशोब तपासणीस व हिशोबाचे जाणकार यांच्यासाठी “हिशोबाची कार्यशाळा” हा संस्थेच्या शाखांचा आर्थिक अहवाला संबंधिचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. आंबेडकर भवन ,दादर येथे संस्थेचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर ,ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया ,ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेच्या इतिहासात प्रथमच आयोजित केला होता. हिशोब कसा लिहावा ? हिशोब लिहितांना येणाऱ्या अडचणी,कार्याबरोबर हिशोब कसा पारदर्शक असावा ,कॅश बुक कसे लिहावे ,शाखांचा जमाखर्च व कार्य याबाबत तपासणी कशी करावी ? याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेने शाखांसाठी खास तयार केलेले कॅश बुक,भरणा पावती ,बील बुक व व्हाऊचर प्रत्यक्ष दाखविण्यात आले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय ऑडिट कमिटी प्रमुख एस. के. भंडारे , ऑडिट कमिटी उपप्रमुख अॅड. एस. एस.वानखडे यांनी केले ,सूत्र संचालन राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी यांनी केले . या कार्यशाळेचे व्यवस्थापन महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे व सरचिटणीस सुशील वाघमारे , मुंबई प्रदेश अध्यक्ष उत्तम मगरे व सरचिटणीस रविंद्र गवई आणि त्यांच्या कार्यकारिणीने केले .या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर ,सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर आणि महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचा आर्थिक व्यवहार हा आरशाप्रमाणे स्वच्छ असावा या उदिष्ट पूर्तीसाठी सूत्रबद्ध व पारदर्शक पद्धतीने लेखा -जोखा असावा, हे एकमताने स्वीकारण्यात आले आणि या उद्देश पूर्तीसाठी पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे ? याचे सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन दोन सत्रात करण्यात आले.
धम्माचा रथ पुढे नेण्याचे जबाबदारीचे काम करत असताना आर्थिक बाजू ही तितक्याच जबाबदारीने हाताळली पाहिजे. हिशोबामध्ये अधिक स्पष्टता राहावी, व्यवस्थितपणा यावा, यासाठीची ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची होती. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या आधारावर या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शकांनी समर्पक माहिती व उत्तरे दिली व राज्य ऑडिट कमिटीसाठी ऑडिट परिक्षा घेण्यात आली . तसेच संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांबाबत काम करत असतांना संस्थेचा आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक पदाधिकाऱ्यांवरती आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
या कार्यशाळेस राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमाताई पवार , राष्ट्रीय सचिव – राजेश पवार ,वसंत पराड ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष -सी बी तेलतुंबडे , तसेच एम डी सरोदे ,रागिणीताई पवार,भारतीताई शिराळ ,वैशालीताई अहिरे ,उज्वलाताई खरात ,चंदाताई कासले, स्वातीताई शिंदे इत्यादी वरिष्ठ केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शाखेचे पदाधिकारी, मुंबई प्रदेशसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, हिशोबाचे जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय आवश्यक असे हे मार्गदर्शन झाले व अशी ऐतिहासिक कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने डॉ. भीमराव य. आंबेडकर, एस. के. भंडारे ,अॅड. एस.एस. वानखडे आणि केंद्रीय कार्यकारीणीचे आभार मानण्यात आले. पूज्य भंते सुमेध बोधी यांच्या आशीर्वाद गाथेने व सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top