Menu

Buddhist Society

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई (12/12/2023)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बौद्धांच्या शिखर धार्मिक संस्थेचा भय्यासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर 1977 पासून गेली 45 वर्षं अध्यक्षपद भूषवलेल्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी केलेल्या धम्म कार्यावर महा उपासिका मीराताई अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या एस के भंडारे ,बी एच गायकवाड व अँड एस एस वानखडे या ताईसाहेबांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ आंबेडकर भवन, दादर येथे दि 12/12/2023 रोजी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंतीच्या कार्यक्रमात आदरणीय महाउपासिका मीरा ताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी डॉ भीमराव आंबेडकर असे म्हणाले की मी जे देशभर कार्यक्रम करीत आहे कार्याचे मजले बांधत आहे ते केवळ आदरणीय ताई साहेब यांनी धम्माचा पाया घातला मुळेच करीत आहे. त्यांनी भय्यासाहेब यांच्या नंतर डॉ बाबासाहेब यांचा धम्म व संस्था संपूर्ण देशभर नेली. या पुस्तकात मीराताई यांचे महान धम्म कार्य, एक अष्टपैलू नेत्रुत्व, बहुमोल संदेश, क्रांतिकारक निर्णय, आम्ही पाहिलेल्या मीराताई व त्यांच्या अध्यक्ष खालील अधिवेशने, समता सैनिक दलाची पुन्हा उभारणी, कार्यकर्त्यांस प्रेरणादायी पैलू, संकल्प आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा इतिहास अशी 10 प्रकरणे असून संकीर्ण याप्रकरणामध्ये मीराताई यांचे सन्मानपपत्रे, 100 निवडक सहकारी ,परिवार आणि जीवन – कार्यपट याचा समावेश करण्यात आला आहे.

अशी माहिती या पुस्तकाचे एक संपादक एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख) यांनी सांगितली. या प्रसंगी दर्शनाताई भीमराव आंबेडकर व मनीषाताई आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभागाच्या प्रमुख सुषमाताई पवार, महाराष्ट्र राज्य शाखेचे राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांचे भाषण झाले. मुख्य वक्ता पाली भाषेचे अभ्यासक पी एस मंडपे यांचे भाषण झाले.

अध्यक्ष स्थानी मुंबई प्रदेश शाखेचे अध्यक्ष उत्तम मगरे होते व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश शाखेचे सरचिटणीस रविंद्र गवई होते. पुस्तक प्रकाशनास आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमास केंद्र, महाराष्ट्र, मुंबई पदाधिकारी व मुंबईतील संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top