Menu

Buddhist Society

चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर

संविधानाने भारतीयांना दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्काच्या विरोधातील कोणतेही कायदे ,मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी-परंपरा कलम 13 नुसार रद्द होतात. -एस के भंडारे

मुंबई – अस्पृश्यतेतील स्त्री -पुरुष व सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता , मनुस्मृती व चातुर्वण्य मध्ये स्त्री ही गुलाम व पुरुषांची संपत्ती होती ,पुरुष तीला विकु किंवा गहाण ठेऊ शकत होता तीला स्वतः ला कोणताही अधिकार नव्हता त्यामुळे महात्मा जोतिराव फुले -सावित्रीमाई फुले यांनी प्रथम शिक्षण दिले व डॉ बाबासाहेबांनी त्यांना संविधानात स्वातंत्र्य व समानतेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी विविध मूलभूत अधिकार व हक्क बहाल केले आहेत.धर्म ,वंश , जात ,जन्म ठिकाण,लिंग इत्यादीनुसार भेदभाव कलम 14,15 नुसार करता येणार नाही ,सर्व समान आहेत अशी तरतूद केली आहे ,कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केली असून अस्पृश्यता बाळगणे हा गुन्हा ठरविला आहे.येवढेच नाहीतर संविधानाने भारतीय नागरिकांना कलम 14 ते 30 नुसार दिलेले समानता ,स्वातंत्र्य , शोषणाविरुद्ध ,धार्मिक स्वातंत्र्य आणि सांकृतिक व शिक्षण या मूलभूत अधिकार व हक्कच्या विरोधातील कोणतेही कायदे कलम 13 नुसार शुन्यवत ठरविलेले आहेत .त्यामुळे मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी -परंपरा रद्द झालेली आहे , ती कोणावरही लादू शकत नाहीत असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी समता सैनिक दलाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन करून भारतीय महिला मुक्ती दिली त्या दिवसाचे अवचित्यसाधून दि 24/12/2023 ते 25/12/2023 रोजीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,चैत्यभूमी ,दादर पश्चिम मुंबई येथील सैनिक केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले .ते पुढे असे म्हणाले की , भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलात प्रथम महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी पदे देऊन सन्मान दिला आणि आतातर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य ,

जिल्हा ,तालुका स्तरावर महिलांच्या स्वतंत्र कार्यकारिणी करून महिलांना स्वाभिमानाचे स्वातंत्र स्थान दिले आहे. आता पुढे स्वातंत्रपणे महिलांनाच महिला शिकवतील अशा केंद्रीय शिक्षिका निर्माण कराव्यात. प्रथम एस के भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला . या प्रसंगी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले उपस्थित होत्या त्यांना एस के भंडारे यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सन्मान केला. त्यांनी मी आज जे काही आहे ते केवळ डॉ बाबासाहेब व त्यांच्या संविधानामूळे असल्याचे सांगितले .या प्रसंगी भन्ते श्रद्धापाल उपस्थित होते. या केंद्रीय शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम ,हेडक्वार्टर सचिव डी एम आचार्य , असि लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले व प्रदिप कांबळे , उपसचिव मोहन सावंत ,लेफ्टनंट कर्नल वंदनाताई सावंत व विनीताताई माने उपस्थित होत्या. तसेच लेफ्टनंट कर्नल रविंद्र इंगळे , मुंबई प्रदेशचे सिद्धार्थ अहिरे व महादेव गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.या दोन दिवशीय शिबिरात मुंबई , ठाणे , रायगड , पालघर ,बिदर(कर्नाटक) ,बीड़ ,पुणे ,जालना ,चंद्रपूर इत्यादी विविध जिल्ह्यातून एकूण 50 महिलां सैनिक /अधिकारी सहभागी झालेले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top