Menu

Buddhist Society

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी. -एस के भंडारे

पनवेल (दि 13/1/2024)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म क्रांती करून 67 वर्षे झाली असून ज्या बहुजनानी धर्मातर केले त्यांच्या बरोबर रोटी -बेटी व्यवहार व त्यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या मुख्य पदावर संधी द्यायला पाहिजे आणि आजच्या स्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी आता आपल्यातले हेवे दावे, कुरबुरी सोडून 2025 साली 10 करोड बौद्ध बनविण्याच्या डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संकल्प पूर्ण करण्याच्या कामाला लागले पाहिजे असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख एस के भंडारे यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या रायगड उत्तर जिल्हा शाखा अंतर्गत पनवेल तालुका शाखेच्यावतीने भीम प्रेरणा संस्कृतीक आंबेडकर भवन , नवीन पनवेल येथे दि 4/1/2024 ते दि 13/1/2024 पर्यत आयोजित बोद्धाचार्य प्रशिक्षण शिबीराच्या समारोप कार्यक्रमात केले.

तसेच एस के भंडारे यांनी , असे 26 वर्षे सलग श्रामनेर शिबीर राबविण्याचा उपक्रम देशातील एकमेव असल्याचे सांगून त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल पनवेल तालुका शाखा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.व सन 1998 साली पहिले श्रामानेर शिबीर घेतलेल्या कार्यकारिणीतील या 26 व्या शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले लक्ष्मण कांबळे यांचे एस के भंडारे यांनी स्वतः ला दिलेली सत्काराची शाल व गुच्छ लक्ष्मण कांबळे यांना देऊन त्यांचा सन्मान केला.या शिबिराचे प्रमुख भन्ते बी सुमेध यांनी सर्वांना त्रीशरण पंचशील दिले व त्यांच्या सूचनेनुसार शिबिरातील तीन श्रामनेरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शिबिरासाठी 10 दिवस प्रशिक्षक म्हणून केंद्रीय शिक्षक प्रकाश माने (नवी मुंबई चे कोषाध्यक्ष ) यांनी जबाबदारीपारपाडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पनवेल तालुका अध्यक्ष राहुल लक्ष्मण कांबळे होते. या समारोप कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शाखेचे सरचिटणीस सुशील वाघमारे व कोषाध्यक्ष विजय कांबळे, रायगड उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड व सरचिटणीस विजय मं. कांबळे,छायाताई गवई इत्यादी प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या दहा दिवशीय शिबिरात प्रामुख्याने तरुण बौद्ध मुलांचा सहभाग होता. सूत्रसंचालन रविकांत जाधव यांनी केले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे राजेश भालेराव, गणेश कांबळे, गोविंद जाधव, संपदाताई गायकवाड, शारदाताई कांबळे इत्यादीनी परिश्रम घेतले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top