Menu

Buddhist Society

भीमा कोरेगावची नुसती लढाई नाही तर स्वाभिमानाची लढाई होती. -डॉ भीमराव य आंबेडकर

पुणे (दि 1/1/2023) आपण भेड बकरी नाही तर सिंहाचे वारस आहोत, इतिहास जाणून घ्या,आपण कोणाचे वारस आहोत.2018 पर्यंत विजयस्तंभांचा इतिहास माहीत नव्हता ,त्यावेळी जगाला कळलं की पेशवाही महारांनी घालविली,येणाऱ्या पिढीसाठी इतिहास सांगायला पाहिजे 2024 मध्ये आमची बॉडी असेल,वंचित सत्तेत असेल ,त्यावेळी आम्ही मिलिटरीचे मेमोरियल स्मारक बनवू या स्वाभिमानाच्या लढाईत महार व काही मातंग ,मराठे पण होते,या लढाया व्यवस्था उलथून टाकण्यासाठी दोन लढाई झाल्या एक कलिंगची लढाई सम्राट अशोकाने हत्यार खाली ठेवली व दुसरी लढाई भीमा कोरेगावची त्यांनी समतेसाठी शस्त्रे हातात घेतली. भीमा कोरेगाव ची लढाई नुसती लढाई समजत नाही तर त्यांनी स्वाभिमानाची लढाई केली असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव च्या 500 महार सैनिकांनी पेशवाई घालवली त्या शौर्य दिनाच्या वर्धापनदिनच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभांच्या जळव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दलाच्या पुणे पूर्व जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केले.ते पुढे म्हणाले की ,डॉ बाबासाहेब यांचा रथ पुढे घेऊन जाणार आपण लढलो नाही तर मानसिक गुलामी येईल त्यासाठी लढावे लागेल ,लढाई स्वाभिमानाची आहे आता शस्त्र बदलली आहेत ,राजकीय सत्ता एस सी , एस टी ,ओबीसी यांच्या हातात आली पाहिजे दिल्लीतील सत्ता पलटवलीपहिजे ,संविधान मानणारी आहेत त्यांना बसवू ,लढाई आम्ही सुरू केली ,आता आम्ही मतदानातून संपवू.
कॅप्टन प्रवीण निखाडे ( ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ) यांनी या प्रसंगी असे म्हणाले की, संविधान विरोधकांनी खाली बसविण्यासाठी आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभा ,समता सैनिक दल आणि रिपब्लिकन मुहमेंट एकत्रितपणे चालवली पाहिजे.

एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल )यांनी असे सांगितले की , चातुर्वण्यचे-विषमतेचे समर्थक व संविधानाचे विरोधक सतेमध्ये आले आहेत,संविधानाने दिलेल्या सोयी सुविधा ,आरक्षण समानता त्या नको असल्यामुळे संविधान बदलन्याची तयारी सुरू आहे त्यामुळे संविधान विरोधकला निवडून देऊ नये नाहीतर पुन्हा पेशवाई येऊन त्यावेळेप्रमाणे गळ्यात मडके व कमरेला खराटा येईल.त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक ,धार्मिक व राजकीय क्रांती गतिमान करावी व प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा /समता सैनिक दल डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली रस्त्यावरचे आंदोलन करेल व प्रत्येक जिल्ह्यातून संविधान सन्मान रथ काढून त्याचा समारोप शिवाजी पार्क मैदानात करणार असल्याचे जाहीर केले. तसेच महाराष्ट्राचे भिकाजी कांबळे (राज्य अध्यक्ष )सुनंदाताई वाघमारे(राज्य महिला कोषाध्यक्ष ), पुणे जिल्ह्याचे प्रकाश ओव्हाळ (अध्यक्ष पुणे पश्चिम ) , सिद्धार्थ नागदेवते (अध्यक्ष पुणे शहर ) यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण सोनवणे (जिल्हा अध्यक्ष ,पुणे पूर्व जिल्हा ) होते. सूत्रसंचालन आयु राजरत्न थोरात यांनी केले. सुरुवातीला समता सैनिक दलाच्यावतीने विजय स्तंभाला डॉ भीमराव य आंबेडकर व एस के भंडारे यांनी पुष्पचक्र वाहिले आणि अशोक कदम , दादासाहेब भोसले ,डी एम आचार्य ,पी एस ढोबळे, प्रदिप कांबळे, आनंदा भेरजे, मंजुळा भावीदुद्दी इत्यादी प्रमुख अधिकारी आणि पुणे ,सांगली,
कोल्हापूर ,सातारा,परभणी, बीड,नाशिक ,नगर ,औरंगाबाद, नांदेड,सोलापूर,कनार्टक इत्यादी विविध ठिकाणावरून आलेल्या समता सैनिक दलाने मानवंदना दिली. शौर्य दिनाच्या निमित्ताने

दि 31/12/2023 रोजी समता सैनिक दलाचे विशेष शिबिर व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व 10 दिवशीय श्रामनेर शिबिराचे जिल्हा शाखेने आयोजन केले होते. तसेच दलाच्या पिंपरी चिंचवड युनिटच्यावतीने 500 तरुण मुलांचे दोन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन मनोज गडबडे यांनी केले होते. दरवर्षी पेक्षा यावर्षीच्या शौर्य दिनी समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या सभेच्या पूर्वी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर,मनीषाताई आंबेडकर व अमन आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली तीत विवेक बनसोडे यांनी लिहिलेले भीमा कोरेगाव वरील अस्मितेच्या लढाईचे वास्तव या पुस्तकाचे उदघाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top