बहुजनांना एकत्र करून संविधान विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काम करावे लागेल-संविधान बदलले तर रस्त्यावर येणार. -एस के भंडारे
छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद (दि 14/1/2024)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना विषमतेचे चटके सहन केले त्याकाळी आपल्या पूर्वजानीही विषमता नव्हे गुलामीत दिवस जगत होते त्यांना बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून विद्वतेच्या जोरावर संविधानाच्या माध्यमातून समानता दिली, शिक्षणाची संधी मिळाली त्यामुळे आपले लोक शिकले, सरकारी नोकरीत आले, अधिकारी झाले. डॉ बाबासाहेबांनी विषमतेची मनुस्मृती जाळली आणि त्या गुलामीतून बाहेर काढून बौद्ध धर्मांतर केले त्यामुळे आपलें लोक शहाणे झाले, मनुस्मृतीच्या चातूर्वन्याच्या रूढी परंपराच्या विरोधात बोलू लागले, विरोध करू लागले त्यामुळे आपल्याला शिक्षणा पासून दूर ठेवणे, संविधानाने दिलेले अधिकार, हक्क, समानतेपासून वंचित ठेवण्यासाठी संविधानच बदलण्याचे कारस्थान ज्यांनी संविधान निर्माण झाले त्यावेळी विरोध केला ते आज सत्तेत आल्याने करत आहेत. त्याविरुद्ध आपणास आवाज उठवावा लागेल, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज इत्यादी समतेच्या महामानवांच्या विचाराच्या लोकांना -बहुजनांना एकत्र करून आरक्षण व संविधान विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काम करावे लागेल. त्यांना मतदानच करू नये असे आवाहन मराठावाडा विदयापीठ नामांतर दिनाचे आवाचित्य साधून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्हा शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावडा विद्यापीठ च्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील पी ई एस सोसायटीच्या मैदानावर आयोजित केलेल्या अभिवादन सभेमध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी केले.पुढे भंडारे असे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत आपले व आपल्या गोर गरीब समाजाचे संरक्षण सरकार, पोलीस करतीलच असे नाही त्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या समता सैनिक दल मध्ये सहभागी होऊन आपणच संरक्षण करूया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2027 च्या समता सैनिक दलाच्या शताब्दी मध्ये 1लाख सैनिक उभाकरायचे असून जर वेळ पडली तर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान बदलण्याच्या विरोधात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल रस्त्यावर आल्याशिवाय रहाणार नाही.
प्रथम सकाळी भडकल गेट येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय सरसेनानी आनंदाराज आंबेडकर, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे, समता सैनिक दल हेडक्वार्टर सचिव डी एम आचार्य, जिल्हा अध्यक्ष मेजर किशोर जोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा विदयापीठ नामांतर दिनाचा 30 वा वर्धापन दिन, समता सैनिक दलाची रॅली काढण्यात आली, रॅलीचा समारोप विद्यापीठ गेट वरील शाहिद स्मारकास आनंदाराज आंबेडकर व एस के भंडारे यांनी पुष्पचक्र वाहून समता सैनिक दलासह मनवंदना दिली.त्यानंतर रॅली समारोप व अभिवादन सभा जिल्हा अध्यक्ष जी ओ सि मेजर किशोर जोहरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेमध्ये हेडक्वार्टर सचिव डी एम आचार्य,मेजर जनरल आनंदा भेरजे, महिला जिल्हा अध्यक्षा गंगाताई सुरडकर,रमेश बनसोडे, मेजर जयवंत गायकवाड, प्रकाश हिवराळे इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी संविधान प्रस्ताविकेची शपथ व समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली . सूत्रसंचालन तेजश्री तुपासागर व नानासाहेब बनकर यांनी केले. रॅली व अभिवादन सभेस औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते.
तसेच दि 13/1/2024 रोजी औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवशीय सैनिक प्रशिक्षण शिबीर केंद्रीय प्रसिक्षक सचिव डी एम आचार्य व उपासचिव मोहन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते त्यामध्ये 70 महिला व पुरुषयांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती.